जळगाव: जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी – दिलेल्या निधीतून झालेली काम ची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता तपासणी केली. रस्ते झालेल्या गल्लीतील लोकांशी संवाद साधला. २५ वर्षानंतर रस्ते होत असल्याबाबत लोकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, महानगर पालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रस्त्याची पाहणी करत असताना एका – भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला – नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी – रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला असे विचारले. त्यावेळी तो म्हणाला मी इथे नियमित भाजीची गाडी घेऊन येतो, पूर्वी गाडी ढकलून थकून जायचो. आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते’ असा अभिप्राय त्यांनी दिला. एक सेवानिवृत्त नागरिक म्हणाले, पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली की घरात धुरळा यायचा. आता नवीन रस्ता झाल्यापासून धुळ नाही. त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे.
कुठे कुठे झाले नवीन रस्ते जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे आदर्श नगर प्रभाग क्र १४ स्वामी समर्थ चौक ते पाटचारीपर्यंत डीपी रस्ता काँक्रीटीकरण, आदर्श नगर प्रभाग क्र १४ सि स नं ४४४ रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत मेहरुण येथील प्रभाग क्रं १४ मधील अशोक किराणा चौक ते स नं २४९ पर्यंत डीपी रस्ता काँक्रीटीकरण, प्रभाग क्रं. ०९ मुक्ताईनगर जगताप यांचे घरापासून ते पवार यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे प्रभाग क्रं ०७ सतीश पाटील यांच्या घरापासुन ते अतुल भोळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नानीबाई हॉस्पटील ते हेमू कलानी बगिचा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे प्रदीप तळवेलकर यांच्या घरापासून ते स्नेहल फ गडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण असे एकूण सात रस्ते नवीन करण्यात आले
जिल्हाधिकाऱ्यांनी मोजली रस्त्याची मजबुती
रस्ता मजबूत झाला आहे की नाही हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. ते हातात घेवून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः त्याची मजबुती किती आहे ती मोजत समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ते चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः सांगितले. हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी
नाल्याच्या काठावर बसवणार पेव्हर ब्लॉक
एक ठिकाणी नाल्याच्या काठावर बरीच जागा सुटलेली होती, तिथे महानगरपालिकेला फेव्हरब्लॉक बसवण्याच्या सूचना दिल्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्याच्या सूचना दिल्या