जळगाव : जिल्हयातील असाक्षर व्यक्तींची परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असाक्षरांची नोंदणी ज्या नजीकच्या शाळेवर झालेली आहे. त्या ठिकाणी जावून त्यांनी परीक्षा दयावयाची आहे. जिल्हयातील एकूण 57608 नव साक्षर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत. त्यापैकी स्त्रियांची संख्या ही 41253, पुरुष संख्या ही 16349 व 06 ट्रान्सजेंडर परीक्षेला प्रविष्ट होत आहेत.
सदर कार्यक्रमात केंद्रसरकार पुरस्कृत असून, यात मोठया संख्येने सर्व नव साक्षर व्यक्तीने उपस्थित राहून, परीक्षा दयावी असे आवाहन, शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परीषद कल्पना चव्हाण यांनी केले आहे.