Jalgaon News : आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंची सभा, काय बोलणार ?

जळगाव : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज ७ रोजी विविध ठिकाणी सायंकाळी सभा होणार आहेत. दरम्यान, या सभेत दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळ शहरातील श्री मातृभूमी चौक येथे सायंकाळी सभा होणार आहे.

महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ५.०० वाजता सभा होणार आहेत.

विशेषतः या दोन्ही सभा महायुतीच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुस्टर डोस ठरणार आहेत.