Jalgaon News: ‘आपली आस्था.. आपले मंदिर’ अभियानाचा प्रारंभ, आता मंदिरे होणार चकाचक!

जळगाव : अयोध्येत प्रभू श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सर्वांना मंदिर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानिमित्त जळगावत आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या मार्गदर्शनाने शहरातील १५०हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला आहे. त्यामध्ये जळगाव शहरामध्ये ‘आपली आस्था.. आपले मंदिर’अंतर्गत स्वच्छता अभियानाला सुरवात करण्यात आली. या अभियानाचा आरंभ शुक्रवारी सकाळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) ) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या वेळी बोलताना आमदार सुरेश भोळे म्हणाले, अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेबाबत जळगाव शहरात चैतन्य निर्माण झाले असून ‘आपली आस्था..आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत माता इच्छादेवी यांचे दर्शन घेऊन आरती करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला.शहरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण जळगावात भक्तीमय आणि राममय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २२ जानेवारीस प्राणप्रतिष्ठा दिनी परिसरातील सर्व घराघरात श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. काही गरज भासल्यास राजूमामा संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असेही राजूमामा यावेळी म्हणाले, तसेच या वेळी सुरेश भोळे व मित्र परिवार यांच्याबरोबर विनोद मराठे, दीपक बाविस्कर, लता वैराट, कोकिळा ढगे, रवींद्र जगताप, संपत कोळी यासह आदी उपस्थित होते.अनेकांनी या श्रद्धेच्या ऐतिहासिक सोहळ्यात सक्रिय भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे. या ‘आपली आस्था…आपले मंदिर’ या श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान शृंखलेत शहरातील ५ मंदिर सजावट, प्रमुख ८ ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीनव्दारे अयोध्या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण, १० चौक सुशोभिकरण आणि शालेयस्तरावर श्रीरामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. असे सांगितले