---Advertisement---

Jalgaon News : एमआयडीसी हद्दीतून 2 दुचाकी लांबविल्या

by team
---Advertisement---

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले.दिलीप सदाशिव चौधरी (73) हे एम.सेक्टर प्लॉट नं.41 याठिकाणी राहतात. मंगळवार 10 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी त्यांनी त्यांच्या मालकीची क्रमांक एमएच 12 क्यु 6710 ही दुचाकी घरासमोर अंगणात पार्किंग केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री ती लांबविली. गुन्हयाचा तपास पोहेकॉ अल्ताप पठाण करत आहेत.

मुदस्सर शेख जावेद शेख (24) हे शाहुनगर येथे राहतात. त्यांच्या मालकीची क्रमांक एमएच 19 एबी 9406 ही दुचाकी त्यांनी 15 जुलै 2023 रोजी रामनगर जळगाव येथे त्यांच्या मामांच्या घरी पार्किंग केली होती.चोरट्यांनी ही दुचाकी रात्री लांबविली. गुन्हयाचा तपास पोना  विकास सातदिवे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment