Jalgaon News: ऑटोगॅरेज समोर दुचाकीची चोरी

जळगाव :  ऑटोगॅरेज समोर दुचाकीची चोरी शेखर ऑटो तसेच लढ्ढा फार्मच्या समोर पार्किग केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. शुक्रवार 1 रोजी सकाळी 11 वा.घटना घडली. शोएब रफिक पिंजारी (22) यांच्या मालकीची 25 हजार किमतीची क्रमांक एम.एच. 19 सीएम 4071 ही दुचाकी चोरीप्रकरणी तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करत आहेत. प्रजापतनगरातून दुचाकी लंपास- संजय जगन्नाथ महाजन (44) हे भाजीपाला व्यावसायिक असून तेकुटुंबासह विसनजीनगरात वास्तव्यास आहेत.

त्यांच्या मालकीची 15 हजार किमतीची दुचाकी क्रमांक एम.एच.19 बीवाय 7351 ही त्यांनी सोमवार 4 रोजी सायंकाळी प्रजापतनगर येथे बैठक हॉलला उपस्थित राहण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच 19 बीवाय 7351 ने गेले. याठिकाणी त्यांनी दुचाकी लावली. रात्री 9.30 वाजता ते आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. शोध घेतला मात्र दुचाकी मिळाली नाही. याप्रकरणी तक्रारीवरुन तालुका पोलीस ठाण्यात बुधवार 6 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोना ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.