---Advertisement---

jalgaon news: ओढणीने फास लावून तरुणाची आत्महत्या

by team
---Advertisement---

दुपारी जेवण केल्यानंतर वरच्या खोलीत गेलेल्या विवाहित तरुणाने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. वाघनगर परिसरातील निसर्ग कॉलनीत गुरूवार 19 रोजी दुपारी ही घटना घडली. दिनेश मधुकर शिरसाठ (36) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा तरुण डॉमिनोज पिझ्झा या ठिकाणी कामाला होता. दुपारी  दिनेश हा घरी आला. जेवण केल्यानंतर तो लगेच वरच्या रुममध्ये गेला.बराच वेळ पर्यंत तरुण खाली न उतरल्याने कुटुंबिय वरच्या रुममध्ये गेले असता प्रकार उघडकीस आला. दिनेश याने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसल्यानंतर कुटुंबियांनी आक्रोश केला. तालुका पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह रुग्णालयात हलविला. तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्यामागचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment