Jalgaon News : गटविकास अधिकार्‍याविरोधात गुन्हा, काय आहे प्रकरण?

जळगाव : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध पोलीसांत गुन्हा झाला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजय दत्तात्रय लोंढे (44, रा. जळगाव, कार्यरत पारोळा) असे संशयिताचे नाव असून, लोंढे यांनी महिला कर्मचार्‍याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

पोलीसांत दिलेल्या फियादीनुसार, 36 वर्षीय पीडीता एका पदावर कार्यरत असून 12 डिसेंबर 2023 ते 23 जून 2023 दरम्यान संशयित आरोपी असलेल्या लोंढे यांनी अनेकादा वाईट हेतूने पीडितेकडे पाहिले. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या दिवशी पीडितेस कारणे दाखवा नोटीस बजावली. याबाबत पीडिता जाब विचारण्यासाठी गेली असता अधिकार्‍याने तिला अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले.

या प्रकाराला कंटाळून पीडितेने जादा प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. गटविकास अधिकारी पीडितेस दालनात बोलावून विचित्र हावभाव करीत असल्याने पीडितेने पतीला सांगण्याची धमकी दिली. यावर या अधिकार्‍याने तिला बदनाम करण्याचा दम भरला. या प्रकणी पीडितेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार  संशयित लोंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.