---Advertisement---

Jalgaon News: गोंडस मुलीला जन्म देत मातेने घेतला अखेरचा श्वास

by team
---Advertisement---

जळगाव : प्रसूति होऊन गोंडस नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर विवाहितेची प्रकृती अत्यवस्थ झाली. उपचारार्थ दाखल केले असता रविवार, १९ रोजी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. नबाबाई समीर पावरा असे मृत महिलेचे नाव आहे.समीर पावरा हे कुंड्यापाणी येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे.

ऊस तोडणी मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नी नबाबाई या गर्भवती होत्या. रविवारी सकाळी ९.३० वाजता प्रसृती कळा होऊ लागल्या. त्यानंतर घरीच त्यांची प्रसृती होऊन त्यांनी गोंडस नवजात मुलीस जन्म दिला. दुपारी बारा वाजता त्यांना असह्य त्रास जाणवू लागल्याने त्यांना खासगी वाहनातून धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

प्राथमिक उपचाराअंती अधिकच्या उपचारार्थ महिलेस रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुपारी दीड वाजता विवाहितेचा मृत्यू झाला. ही वार्ता कानावर पडल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. विवाहितेच्या पश्चात पती समीर, मुले अनिकेत, आयुष तसेच अंकीत तसेच नवजात मुलगी असा परिवार आहे

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment