Jalgaon News : ग. स. सोसायटीच्या सभासदांना मिळणार ‘इतके’ टक्के लाभांश

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीची सभासद संख्या ३४ हजार असून खेळते भांडवल ११०७.२७ कोटी रुपये आहे. यंदा ग. स. सोसायटीला १२.५८ कोटीचा नफा झालेला आहे. सन २०२२-२३ आर्थिक वर्षात सभासदांना यावर्षी १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती ग. स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग.स. उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, गटनेते अजबसिंग पाटील, रावसाहेब पाटील, सुनील सूर्यवंशी, प्रतिभा सुर्वे, भाईदास पाटील, महेश पाटील, रागिणी चव्हाण, अजय देशम ख, योगेश इंगळे, ज्ञानेश्वर सोनवणे, मंगेश भोईटे, विश्वास पाटील, योगेश सनेर, अनिल गायकवाड, अजयराव सोमवंशी, नीलेश पाटील, मनोज माळी, विजय पवार, राम पवार, व्यवस्थापक वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

उदय पाटील म्हणाले की, ग.स. संस्थेच्या या संचालक मंडळाच्या संस्थेच्या या संचालक मंडळाच्या कार्यकाळात सभासद हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात सन २०२२ -२३ आर्थिक वर्षात सभासदांना यावर्षी १० टक्के लाभांश, १०० टक्के संपूर्ण कर्ज माफीचा ऐतिहासीक निर्णय घेऊन ग. स. चे ७१ मयत सभासदांना रक्कम रू. ३.३५ कोटी माफ, कर्ज नसलेल्या ११४ मयत सभासदांच्या कुटुंबास प्रत्येकी १.५० लाख याप्रमाणे १.७१ कोटी रुपयेआर्थिक सहाय्य, संस्थेचे कोटी रुपये आर्थिक सहाय्य, संस्थेचे ४३४ थकबाकीदार सभासदांकडून १२.१० कोटी विक्रमी वसुली, जिल्हयात सर्वात जास्त व्याज देणारी व पोस्टापेक्षा अधिक व्याजदर देणारी ग. स. ठेव योजनेचे व्याज दर, सभासद कर्ज मर्यादित एकुण १५.०० लाखांपर्यंत वाढ, वय वर्ष ७० पर्यंतच्या सर्व सभासदांसाठी ५ लाखांचा जनता अपघात विमा, जेष्ठ सभासद सन्मान योजना अंतर्गत अखंड २५ वर्षे सभासदास १० हजार, राजम जाता जिजाऊ कन्यादान योजना अंतर्गत सभासद मुलीच्या विवाहप्रसंगी ५ हजार, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेतगत १ व २ मुलीनंतर कुटूंब नियोजन केल्यास प्रत्येकी २५ हजार व १२,५०० रुपये, ग. स. मोबाईल अॅपव्दारे सभासदांना त्यांचे खात्याची माहिती सुविधा उपलब्ध आदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सेवानिवृत्त सभासदास वर्गणीच्या रक्कमेच्या ५० टक्के रक्कम येणे कर्जात वर्ग करण्याची ऐच्छिक मुभा, संस्थेचे मयत कर्मचाऱ्याच्या वारसा अनुकंपातत्वाखाली तत्काळ नोकरी, शासन राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खेळाडू आदर्श शिक्षक, ग्रामसेवक तसेच सभासदांचे गुणवंत पाल्य यांना चांदीचे पदक व मानचिन्ह देवून गौरव व सत्कार करण्यात येणार असल्याचे उदय पाटील यांनी सांगितले.

आज ग.स.ची वार्षिक सर्वसाधारण सभा
 रविवारी २७ रोजी दुपारी १ वाजता ग.स.ची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत विविध विषयावर चर्चा होणार आहे. मात्र ही या वर्षांतील कामकाजाची पहिलीच सभा असल्याने सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..