Jalgaon News : घरफोड्या करायचे, अखेर पाच गुन्हेगारांना केले जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव : घरफोड्या, चोरी व अन्य गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख महिलेसह पाच जणांना जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे.

भावना जवाहरलाल लोढा  (३८, रा. अयोध्यानगर),  टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (४०, रा. अयोध्यानगर), सैय्यद सजील सैय्यद हारुन (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद आमीन सैय्यद फारुख पटवे ऊर्फ बुलेट (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सैय्यद अराफत सैय्यद फारुख (३४, रा.तांबापुरा) यांचा समावेश आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील हद्दपार प्रस्तावाननुसार वरील पाच जणांविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाणे, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे, पहूर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे, चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या पाचही जणांनी सदरचे गुन्हे टोळीने केले. तसा प्रस्ताव जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन त्यात माहिती निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.

पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सैय्यद,  इम्तियाज खान यांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलिस अधीक्षकांकडे पाठविला. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनील दामोदरे यांनी पाहिले. या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षकां एम. राजकुमार यांनी पाचही जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपारीचे आदेश दिले.