जळगाव : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत तीन महिलांची मंगलपोत लंपास केल्याची घटना नवीन बस स्थानक परिसरात घडली. दोन महिलांना हा प्रकार लागलीच लक्षात येताच त्यांना तुटलेली पोत मिळून आली. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
शहरातील नवीन बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. बसमध्ये चढतांना याच गर्दीचा फायदा घेत लहान मुले महिलांच्या गळ्यातील किंवा त्यांच्या पर्समधील सोने चांदीचे दागिने लांबवित असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.
दरम्यान, रविवारी २० ऑगस्ट रोजी दिवसभरात नवीन बस स्थानकामधून तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी व पोत लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. पोत ओढल्यानंतर महिलांना गळ्यातील पोत कोणीतरी ओढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी पोत सुरखुप राहिली. तर एका महिलेच्या गळयातील पोत चोरण्यास चोरटे यशस्वी झाले. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.