jalgaon news: जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय समिती घेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती, शासकीय योजनाचा लाभ कसा घ्यावा याची माहिती 100 सुपर वॉरीअर्सतर्फे घरोघरी पोहचणार आहे. आगामी निवडणूकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा असेल. त्यामुळे याबाबत कोणीही कितीही चर्चा करत असेल त्याकडे दुर्लक्ष्ा करणे योग्य होईल, असे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.प्रदेशाध्यक्ष्ा चंदशेखर बावनकुळे हे नोव्हेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्यापूर्वी श्री. चौधरी यांनी दौरा केला. त्याची माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसपासून उत्तर महाराष्ट्रात दौरा करीत आहे. पंतप्रधान मोदींनी केलेल्या कामाबाबत जनता समाधानी असल्याचे दिसून आले. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष्ााचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष्ा चंद्रशेखर बावनकुळे हे दौऱ्यावर येत आहेत.  त्याची पूर्व तयारी म्हणून हा दौरा आहे.

यासाठी विधानसभानिहाय 100 सुपर वॉरीअर्स नियुक्त केले आहेत. त्यांची भूमिका महत्वाची आहे.  त्यांना प्रशिक्ष्ाण दिले आहे. हे वॉरीअर प्रत्येक घरात जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती देेत सर्व सामान्य लोकांच्या भावना समजावून घेणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष्ाांचा दौरा  प्रदेशाध्यक्ष्ा चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. ते 5 नोव्हेंबरला रावेर, 6 ला जळगाव, 7 ला धुळे, 8 ला नंदुरबार 9 ला इंदौर असा त्यांचा दौरा आहे. विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनाच्या माहितीसाठी सरल ॲप सुरू केले आहे. त्याचीही माहिती या वॉरीअर्सकडून देण्यात येणार आहे. या योजना नागरीकांपर्यत कशा पोहचतील, त्यांचा लाभ कसा घ्यावा याची माहितीही यातून देण्यात येणार आहे.

राजकीय लुटीची दुकाने बंदचा धोका मोंदींची लोकप्रियता वाढत असल्याने सर्व विरोधक एकत्र होत आहेत. कारण 2024 मध्ये मोंदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. याचा त्यांना अंदाज आला आहे. त्यामुळे आपली राजकीय लुटीची दुकाने बंद होऊ नये म्हणून ते एकत्र येत भिंग लावून चुका शोधत आहेत.

वाढती महागाई कमी करण्याबाबत प्रयत्न  गॅस व पेट्रोलचे वाढलेले दर कमी करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही चौधरी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष्ाा स्मीता वाघ, जिल्हाध्यक्ष्ाा उज्ज्वला बेंडाळे,  ग्रामिणचे  जिल्हा उपाध्यक्ष्ा अमोल जावळे, जिल्हा सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी आदी उपस्थित होते.

कोअर व केंद्रीय कमिटी ठरवेल तो उमेदवार

भाजपची एक पध्दत आहे. त्यानुसार विधानसभा, लोकसभा निवडणूकीत कोणता उमेदवार द्यावा, किती जागा लढवाव्यात याचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय कोअर समिती घेते. राज्यात तीन पक्ष्ाांची युती आहे. त्यामुळे कोणाला किती जागांचे वाटप होईल हे वरिष्ठ नेतेच ठरवितील. मला तिकीट मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. ती व्यक्त करणे गैर नाही. परंतु अतिम निर्णय पक्ष्ा पातळीवरील वरिष्ठ नेते घेत असतात. त्यामुळे ते निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील.