---Advertisement---

Jalgaon News: जावयाला उलटे टांगून शालकासह सासऱ्याची मारहाण

by team
---Advertisement---

यावल ः तालुक्यातील लंगडा आंबा या आदिवासी पाड्यावर 24 वर्षीय जावायाला त्याच्या शालकांनी व सासऱ्याने चक्क घरात उलटे टांगून जबर मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी यावल पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लंगडा आंबा, ता.यावल या गावात रताळ्या बारेला यांच्या घरात त्यांच्या जावाई राजू भीमसिंह बारेला (24) याला त्यांच्या पत्नीसोबत झालेल्या वादाच्या कारणावरून शालक संजय उर्फ संजू रताळ्या बारेला, सोन्या रताळ्या बारेला आणि रताळ्या बारेला या तिघांनी उलटे टांगून जबर मारहाण केली आणि त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याने तेथून पळ काढला व घडलेला प्रकार आपल्या भावाला सांगितला. याप्रकरणी यावल पोलिसात ठाण्यात रवींद्र भीमसिंह बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणाविरुद्ध मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment