जळगाव : शहरातील डिमार्ट ते मोहाडी रोड रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना गती येणार आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून ११ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. जळगाव शहरातील मोहाडी रोडाला लागून अनेक कॉलनीत नागरिकांचा रहिवास आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरुन वाहन चालविण्यासाठी नागरिकांची कसरत होत होती. तसेच त्रासाचाही सामना करावा लागत होता.
या रस्त्याच्या कामासाठी मागील काळात निधी उपलब्ध करण्यात आला होता. परंतु, हा निधी पुरेसा नसत्याने नागरिकांच्या त्रासाला दूर करण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी केंद्र शासनाकड पाठपुरावा करून केंद्रीय नितीन मंत्री यांच्या मार्फत फंड अंतर्गत शहरातील डीमार्ट ते मोहाडी गावाकडे जाणारा रस्त्याच्या कामासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला.
गडकरी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उममुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.