Jalgaon News : ढगफूटी पावसाचा कहर; दोघांचे मृतदेह मिळाले, एक अद्याप बेपत्ता

जळगाव : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. जळगाव जिल्हयात देखील बुधवार, ५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे मोठी हानी झाली आहे तर रावेर तालुक्यात तीन व्यक्ती बेपत्ता झाले होते. त्यात दोघांचे मृतदेह  मिळून आले आहे तर अद्याप एक बेपत्ता असून, शोध मोहीम सुरु आहे. बळीराम रायसिंग बारेला व शेख इकबाल शेख सत्तार असे मयतांची नावे आहे.

दरम्यान,  मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर ढगफूटी पाऊस झाल्याने रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुर आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर पर्वतामध्ये डगफूटी सदृश्य झाली असल्याने रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुर आल्याची प्राथमिक माहिती आहे. सिमेवर पावसाचा जोर इतका होता की रावेर तालुक्यातील सुकी धरण, मंगळूर धरण, आभोळा धरण पहीलाच्या पावसात ओव्हरफ्लो झाली. रावेर तालुक्यातील रावेर जूना सावदा रोडवरील नागझिरी नदीच्या पुलावरून पाणी होते म्हणून बंद होता. उटखेडा कुंभारखेडा सुकी नदीच्या पुलावरुन पूरावरून मोठ्या प्रमाणात पाणी होते. म्हणून हा देखिल पुल वाहतुकीसाठी बंद होता.

रावेर तालुक्यात पडलेल्या पावसा संदर्भात हतगुर धरणाचे उपविभागीय अभियंता श्री चौधरी सांगतात, एकाच स्त्री एवढ्यामोठ्या प्रमाणात पाऊस पड आणि एकाच पावसात धरणे ओव्हरफ्लो होतात, एखाद्या वेळेस मध्यप्रदेश, महाराष्ट्र सिमेवर ढग फुटीसहस्य पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

ढगफूटी सदृश्य पावसाने झाली मोठी हानी
मध्य प्रदेश व महाराष्ट्रा सिमेवर पर्वतामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने अनेक नदी नाल्यांना पाऊस आला. यामध्ये रावेर शहरातील शेख इकबाल शेख सत्तार याचा नागझिरी नदीत मृत्युदेह आढळला तर दुसरा मोरव्हाल येथील बळीराम रायसिंग बारेला याचा अभोडा नदित मृत्यु देह सापडला आहे तर अजून एकाचा शोध सुरु आहे. तर दहा गुरे दगावली असून, शंभरच्या वर घरांची पडझड झाली आहे.