जळगाव : तरूणीने राहत्या घरात मध्यरात्री ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुभांगी बापू अवटे (१८) असे मयत तरूणीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, शुभांगी अवटे ही तरूणी रामेश्वर कॉलनी परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. गुरूवार १७ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या परिवारासह जेवण करून मागच्या खोलीत झोपली. मध्यरात्री तिनी लोखंडी सिडीच्या मदतीने छताच्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी शेजारी राहणाऱ्यांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.
आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ सचिन मुंडे हे करीत आहे.