Jalgaon News: तर घरकुलधारकांनाही लागणार मालमत्ता करासह स्वतंत्र पाणीपट्टी, सेवाशुल्क होणार बंद

जळगाव :  महापालिकेच्या मालकीच्या घरकुलधारकांना सेवाशुल्क कराऐवजी एप्रिल २०२४ पासून सामान्य मालमत्ताधारकांप्रमाणेच मालमत्ताकर व स्वतंत्र पाणीपट्टी लावण्यात येणार आहे. मात्र याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या परिपूर्ण स्वतंत्र अशा अहवालावर याबाबतची सारी भिस्त असणार आहे. शहरातील झोपडपट्टी नष्ट करून झोपडपट्टीधारकांनाही त्यांचे हक्काचे घरकूल मिळावे म्हणून तत्कालिन नगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी घरकुल योजना राबविली होती. आर्थिकदृष्या दुर्बल असलेल्या घटकांना ही घरकुले निवासासाठी देण्यात आली आहेत. ही घरकुले त्यांना विकणे, भाड्याने देणे किंवा हस्तांतरण करता येणार नाही या अटी-शर्तीवरच देण्यात आली होती.

सर्वसामान्य मालमत्ताधारकांप्रमाणे घरकुलधारकांना मालमत्ता कर व पाणीपट्टी न लावता सेवाशुल्क लावण्यात आले होते. प्रतिदिवस ५ रुपयांप्रमाणे विषाला १८२५ रुपये महापालिकेत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अमृत योजनेचा पहिला टप्पा पूर्णत्वास येत आहे. वाघूर धरणात जळगाव महापालिकेसाठी पुरेसा पाणीसाठा राखीव असत्याने २४ तास पाणी देण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार ‘अमृत ००२’मध्ये महापालिकेने वॉटर मीटर घेण्याचे ठरविले आहे. त्याचा डीपीआरही मंजूर झालेला आहे. यानुसार येत्या वर्षभरात महापालिकेत वॉटर मीटर दाखल होत.

ते प्रत्येक नळसंयोजनास लावण्यात येणार आहे. २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकाने वापरलेल्या पाण्यानुसार त्याला पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे.सेवाशुल्काऐवजी मालमत्ताकर,पाणीपट्टी अमृत योजनेत लागणार वॉटर मीटर घरकुलधारकांनी अद्याप अमृतचे नळसंयोजन अद्याप घेतलेले नाही, तर महापालिकेनेही थकबाकी असल्याने त्यांना नळसंयोजन दिलेले नाही. याबाबत ११ जानेवारी २४ रोजी प्रशासकांनी ठराव क्रमांक ५० व्दारे घरकुलधारकांना २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात घरकुलधारकांना सेवा शुल्क आकारणी बंद करून रितसर इतर मिळकर्तीप्रमाणे मालमत्ताकर व स्वतंत्र पाणीपट्टीची आकारणी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यानुसार घरकुलधारकांना अमृतचे नळसंयोजन देताना त्यास वॉटर मीटर लावण्यात येणार आहे