Jalgaon News : तापमानामुळे मालमत्ताकर भरण्यासाठी प्रभाग कार्यालयातील वेळेत बदल

जळगाव : शहराचे वाढते तापमान लक्षात घेता मालमत्ता कर भरण्यासाठी कार्यालयांच्या प्रभाग वेळेत ३१ मेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार चारही प्रभाग कार्यालये ही सकाळी ८ ते १ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरू राहतील. यावेळेत नागरिकांनी मालमत्ता करांचा भरणा करावा, असे असे आदेश महापालिकेच्या आयुक्ता पल्लवी भागवत यांनी आज काढले.

शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ते ४० ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे करांचा भरणा करण्यासाठी नागरिकांना भरउन्हात प्रभाग कार्यालयात यावे लागते. त्यामुळे या वेळेत बदल करण्याची मागणी होत होती.

३१ मेपर्यंत राहील वेळेत बदल पर्यंत सकाळी ८ ते १ व सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सुरू राहतील. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी या वेळेत या कार्यालयात यावे. सुटीच्या दिवशीही कार्यालये सुरू २३ मे ला बुध्द पौर्णिमेची सुटी असली तरी चारही प्रभाग कार्यालये सुरू राहणार आहेत.

शनिवार व रविवारीही कार्यालये सुरू राहणार असून करांचा भरणा करता येणार आहे. १० टक्के सुटसाठी ९ दिवस मालमत्ता करांवर १० टक्के सवलत घेण्यासाठी आता ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी करांचा भरणा मुदतीत करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या महसूलच्या उपायुक्ता निर्मला गायकवाड, सहआयुक्त गणेश चाटे यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.
चारही प्रभाग कार्यालये ३१ मे