Jalgaon News : “तू पत्नीला सोडून दे”, प्रियकराची प्रेयसीच्या पतीला धमकी

जळगाव : तू तुझ्या पत्नीला सोडून दे अन्यथा तुझ्या मुलाला मी उचलून घेऊन जाईल, अशी प्रेयसीच्या पतीला धमकी दिल्याप्रकरणी शाहूनगरातील शाहरुख नावाच्या तरुणाविरुद्ध (पूर्ण नाव समजू शकले नाही) अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शाहरुख या तरुणाचे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने या महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. त्यात तू तुझ्या पत्नीला सोडून दे अन्यथा तुझ्या मुलाला मी उचलून घेऊन जाईल अशी धमकीदेखील दिली.

त्यावरून प्रेयसीच्या पतीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धमकी देणारा शाहरुख विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार विजय पाटील करीत आहेत.