Jalgaon News : दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव :  दुचाकी चोरी करणार्‍या चौकडीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (43, शिरसोली) यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.एल. 3032) ही घरासमोरून चोरट्यांनी 21 मे रोजी रात्री 11 वाजता चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बुधवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भिल, किरण गोपाळ भिल, मयुर किशोर बारी आणि सौरव राजू सोनवणे (सर्व रा. शिरसोली, ता.जि.जळगाव) यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या दोन दुचाकी आणि शिरसोली शाळेतील चोरून नेलेले साहित्य काढून दिले. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, छगन तायडे आदींच्या पथकाने आरोपींना अटक केली.