जळगाव : शहरातून पिंप्राळ्याकडे जात असलेल्या प्रवाशी रिक्षेला अचानक आग लागली. सतर्क चालकाच्या लक्षात प्रकार येताच त्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबविली. त्यानंतर आगीचा भडका होऊन रिक्षा जळून खाक झाली. गुरुवार, 12 रोजी दुपारी भोईटे नगर पिंप्राळा मार्गावर उड्डाण पुलाजवळ ही घटना घडली. मनपाच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी जावून आग नियंत्रणात आणली.
गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्रमांक एमएच 19 व्ही 3488 ही रिक्षा घेऊन चालक शहरातून भोईटेमार्ग पिंप्राळाकडे जात होता. महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ रिक्षाची वायर जळण्याचा चालकास संशय आला. त्याने सतर्कतेने तत्काळ रस्त्याच्या बाजुला रिक्षा थांबविली. चालक रिक्षा चेकींग करणार तोच आगीने भडका घेतला. क्षणात संपूर्ण रिक्षा या आगीच्या चपाट्यात सापडून खाक झाली. घटना कळताच अग्नीशमन बंब घटनास्थळी आला व आग विझविली. अग्नीशमन दलाचे फायरमन भारत बारी, तेजस जोशी, रवींद्र बोरसे, वाहनचालक युसूफ पटेल यांनी ही आग विझविली.