---Advertisement---

jalgaon news: नमखेडी शिवारातून दीड लाखांचा ऐवज चोरीला

by team

---Advertisement---

जळगाव ः जळगाव शहरापासून जवळ असलेल्या निमखेडी शिवारातील साई पॅलेसमधील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्ती आणि रोकड मिळून एक लाख 54 हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.  विजया चंद्रप्रकाश पद्मावत (45, साई पॅलेस, निमखेडी शिवार, जळगाव) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. कामानिमित्ताने शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता विजया पद्मावत या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्याने ही संधी चोरट्यांनी साधली. बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड मिळून एक लाख 54 हजारांचा किंमतीचा मुद्देमाल लांबवला.  हा प्रकार शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता विजया पद्मावत या घरी आल्यानंतर लक्षात आला. त्यांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---