जळगाव : जिल्ह्यात दमदार नसला तरी जळगाव तालुका व शहर परिसरात जुलैच्या तिसऱ्या सप्ताहापासून संततधार पाऊस सुरू आहे. एक प्रकारे संततधार पावसामुळे जळगाव खऱ्या अर्थाने जलगाव झाले असून रविवार, ४ रोजी सकाळी जळगाव जंक्शन स्थानकावर आरएमएस पोस्ट ऑफिस कार्यालयाजवळ प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या बैठकीच्या भिंतीमधून पाण्याचे झरे वाहत असल्याचे दिसून आले.
जळगाव शहरात गेल्या तीनचार दिवस नव्हे तर दहा बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या रिपरिपमुळे शहर परिसरात गल्लीबोळात चिखल आणि सततचे ओलसर वातावरण आहे. जळगाव जंक्शन स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याभोवती आजूबाजूच्या परिसरातील आलेले पाणी साचत असून तर मोठे दुर्गधीयुक्त डबके तयार झालेले आहे.
तर जंक्शनच्या तीन नंबर फलाटावर आरएमएस पोस्ट कार्यालया नजीक असलेल्या शेडखाली छतावरील पाण्याचा पाईपाला गळती लागल्याने प्रवाशांसाठी बसण् याच्या बाकावरील ग्लेझींग मार्बलटाईल्समधून पाण्याचे कारंजे उडत आहेत. तसेच मुख्य तिकीट निरीक्षक कार्यालयाजवळ देखील छतावरील पाण्याचा पाईप फुटलेला असून मोठ्या प्रमाणात पाणी धो-धो वहात असल्याचे दिसून येत आहे