जळगाव : दिवसेंदिवस महिलांनवरती अत्याचार वाढतच आहेत अश्यातच जळगाव येथील मेहरूण परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक ८ वर्षीच्या लहान मुलीसोबत जवळच्याच नातेवाईकाने अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
गेल्या बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही मुलगी आपल्या मावशीकडे गेली असता मावशीच्या पतीने तिला जवळ ओढून तिच्यासोबत अश्लिल चाळे केले.हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन तपास करीत आहेत.