जळगाव : राज्यातील एसटी बसला होणारे अपघात वाढत असल्याचे दिसून येत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाले आहे. यातच पुन्हा बस आणि कंटेनरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत जिल्हाधिकारी फेसबुक पेजवर माहिती देण्यात आली आहे.
जामनेरजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात ५ ते ६ बस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अपघात स्थळासमोरील समर्थ रुग्णालयात नेण्यात आले. इतर सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कोणतीही दुखापत झाली नाही. जिल्हा प्रशासन आवश्यक ते सहकार्य करत आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ शुक्रवार, २८ रोजी, टायर फुटल्याने बस थेट बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. या अपघात नऊ प्रवासी जखमी झाले होते.