Jalgaon News: बोरांचा वापर करुन चित्रकार सुनिल दाभाडे यांनी साकारली प्रभू श्रीरामांची मोजेक पोट्रेट

जळगाव :  भारतात राममय वातावरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद् उद्घाटन २२ जानेवारीला होत आहे. या पार्श्वभूमीवर मानव सेवा विद्यालयातील शिक्षक, चित्रकार सुनिल दाभाडे यांनी बोरांचा वापर प्रभू श्रीरामांचे भव्य असे मोजेक पोट्रेट साकारले आहे. याव्दारे त्यांनी शबरीच्या बोरांने सुखावलेल्या श्रीरामांचे दर्शन घडवून दिले. त्यांनी रामाला वंदन करण्यासाठी ज्या बोराने राम ाला सुखावले होते असे बोर हे घेत त्याचा वापर करुन प्रभू श्री रामांची मोजेक पोट्रेट पेटींग साकारली.

ही मोजेक पोट्रेट पेटींग २ फूट रुंदी व ४ फूट लांबीची कलाकृती तयार करण्यासाठी त्यांना २ तास १ मिनिट २४ सेकंदाचा कालावधी लागला. कलाकृतीसाठी ४ किलो बोर लागले. एकूण बोरांची संख्या १ हजार १११ लागले आहे. अशा प्रकारे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपले व शाळेचे जय श्री राम ॥ ॥ नाव जगाच्या पाठीवर नेले आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलीया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, सर्व पदाधिकारी, सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.