---Advertisement---

jalgaon news: बोला आयुक्त साहेब, सांडपाण्याचा निचरा होणार कधी?

by team

---Advertisement---

येथील निमखेडी शिवारातील वैष्णवी पार्क परिसरात खुल्या जागेत सांडपाण्याचा मोठा तलाव साचला आहे. सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत नागरिकांनी महापालिकेला अनेक निवेदने दिली. परंतु महापालिकेने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे येथील नागरीक ‌‘बोला आयुक्त साहेब, सांडपाण्याचा निचरा होणार कधी’ ? असा प्रश्न विचारत समस्या सोडविण्याचे साकडे कर्तव्यदक्ष्ा प्रशासक तथा आयुक्तांना टाकत आहेत.

निमखेडी शिवारात असलेल्या वैष्णवी पार्क परिसरात 2002 पासून मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली आहे. मध्यम वर्गीय नोकरदार असलेल्या या वसाहतीत चांगल्या रस्त्याची व गटारीसह सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या भेडसावत आहेत. पक्क्या गटारी नसल्याने नागरीकांनी उताराच्या दिशेने सांडपाण्याचा निचरा केला खरा, परंतु हे सर्व सांडपाणी जवळ असलेल्या एका खासगी खुल्या जागेत साचत आहे. त्यामुळे जवळपास 3 एकर जागेत सांडपाण्याचा मोठा तलाव तयार झालेला आहे.या समस्या सुटाव्यात म्हणून नागरीकांनी महापालिकेकडे अनेक निवेदने दिलीत. परंतु त्यावर महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही.

बीडीओ गेले लोकशाही दिनात

येथील रहिवासी असलेले जळगावचे बीडीओ रवींद्र सपकाळ यांनी या समस्येला कंटाळून थेट लोकशाही दिनात धाव घेतली. त्यामुळे आरोग्य विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या सांडपाण्यावर ऑईल फवारले. मात्र समस्या सुटली नाही.

आम्ही काय करावे ? 

मी 15 वर्षापासून राहत आहे. तेव्हापासून साचलेल्या सांडपाण्याचा निचरा करण्याबाबत पाठपुरावा करत आहे. परंतु मनपाचे ढिम्म प्रशासन काही हालत नाहीत. त्यामुळे आम्ही काय करावे?

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---