एरंडोल : पारोळ्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने उडवत्याने तरुणाचा मृत्यू तर चौघे जखमी झाल्यानंतर संतप्त शहरवासीयांनी महामार्गावर रास्ता रोको केला तर रास्तादेखील जेसीबीद्वारे खोदण्यात आल्यानंतर रात्री वाहतूक ठप्प झाली होती. धरणगावात तरुणाचा मृत्यू झाला
सूत्रांच्या माहितीनुसार, पारोळ शहराकडून येणाऱ्या ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक दिली. या अपघातात जितेंद्र भालेराव वय (३०, धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला तर धनंजय साठे (४०), शाहरूख पठाण (२८), बाळू पवार (२४) व कैलास पवार (२५) हे जखमी झाले. हा अपघात एरंडोल शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अमळनेर नाक्यानजीक बुधवार, १० जानेवारी रात्री पावणेआठ वाजे वाजेच्या सुमारास घडला. ट्रक (एम.एच.४८ ए.टी. ७६८२) ने पारोळा शहराकडून येत असताना दुचाकी (एम.एच.१९ बी.के.०४४२) या क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जितेंद्र भालेराव (३०, धरणगाव) हा जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले.