Jalgaon News: भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

जळगाव:  नातेवाईकाकडे येत असताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक तरुण गंभीररित्या जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. शनिवार, १३ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना नशिराबाद ओव्हरब्रिजजवळ सर्व्हस रोडवर घडली. मडिया भाऊसिंग भीलाला असे मृत तरुणाचे नाव आहे. मडिया भिलाला हा कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्याच्यासाठी चार पाच वर्षापासून भुसावळ येथे वास्तव्यास आहे. मरीमाता मंदिर भुसावळ रोड येथे सुरू असलेल्या एका बांधकाम साईडवर कुटुंबासह हा तरुण वास्तव्याला होता.

आज दुचाकीने तो जळगावकडे येत होता. सव्र्व्हसरोडने येत असताना नशिराबाद ओव्हरब्रीजजवळ भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तो गंभीररित्या जखमी झाला. नशिरबादा पोलिसांनी  रुग्णवाहिका बोलवून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासाअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान नशिराबाद पोलिसांना घटनास्थळी या तरुणाचा मोबाईल मिळाला होता.

तोपर्यत त्याची ओळख पटली नव्हती. दुपारी नातेवाईकांनी या मोबाईलवर संपर्क केला असता तो पोलिसांनी रिसीव्ह केला. पोलिसांनी नातेवाईकांनी रुग्णालयात बोलविले. नातेवाईकांनी तरुणाला पाहिल्यानंतर त्याची ओळख पटली. रुग्णालयात पंचनामाचे कामकाज शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रवींद्र पाटील यांनी केले. तसेच कागदपत्र नशिराबाद पोलीस ठाण्याकडे खाना केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.