Jalgaon News: भरधाव वाहनाने तरुणाला उडविले, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव : रस्त्याने पायी जात असताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने सिरालाल सखाराम सोलंकी याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, १८ रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादच्या पुढे भुसावळकडे झाला. अत्यवस्थ अवस्थेत जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता उपचारात त्याची प्रकृती गंभीर होवून मृत्यू झाला.

सिरालाल हा सालदारकी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, आई वडिल, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.