---Advertisement---

Jalgaon News: भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग डोक्यात टाकली फरशी, रुग्णालयातील घटना

by team
---Advertisement---

जळगाव :  दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात फरशीचा तुकडा टाकून त्यांना जखमी केले. ही घटना रविवार २५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घडली. जितेंद्र शंकरसिंग राजपूत हे त्यांच्या मुलासोबत दुचाकीने जात असताना संशयितांनी दुचाकीचा कट मारला होता.

यात जितेंद्र याच्या शालकाला दुखापत झाली. शालकावर उपचार करण्यासाठी जितेंद्र हे रुग्णालयात आले होते. याठिकाणी संशयितांनी शालकाशी भांडणाला सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यास जितेंद्र हे गेले असता गोपाल रामचंद्र माळी याने हातातील फरशीच्या तुकडा डोक्यात मारुन दुखापत केली. शालकाला मारहाण करुन तिघे पळून गेले.

याप्रकरणी अजय रविंद्र कोळी, गोपाल माळी, रितेश संजु गोंळधी, पंकज जसपाल चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या विरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हेड कॉन्सटेबल निलेश भावसार करीत आहेत

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment