जळगाव : भाजपापक्षांकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या विविध जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येत आहे. यात विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात तीन अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.
भाजपतर्फे जिल्ह्यात यापूर्वी जळगाव ग्रामीण व जळगाव शहर असे दोन अध्यक्ष दिले होते. यात बदल करत आता तीन अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत. जळगांव व रावेर लोकसभा मतदारसंघनिहाय दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. तर शहरासाठी स्वतंत्र अध्यक्ष आहेत.
जळगाव ग्रामीणसाठी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जळगाव शहराध्यक्षपदी उज्वला बेंडाळे, तर रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी अमोल जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडीचं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. विशेषतः जळगाव शहराध्यक्षपदी पक्षाने प्रथमच महिलेला संधी दिली आहे.