जळगाव : शहरातील रामानंद नगरातील शास्त्री नगरात एका १५ वर्षीय विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कृष्णप्रिया उर्फ साक्षी अरुण पाटील (वय १५, रा. शास्त्रीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील मूळ रहिवासी अरुण पाटील हे पत्नी व दोन मुलांसह जळगाव शहरातील शास्त्रीनगर येथे वास्तव्यास आहे. शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह भगवतात. त्यांची मुलगी कृष्णप्रिया ही शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. अरुण पाटील हे पत्नी व मुलाला घेवून शिरपुर येथे कामानिमित्ता गेले होते. त्यावेळी घरात कृष्णप्रिया ही मुलगी एकटीच होती.
बुधवारी सकाळपासून कृष्णप्रिया घराबाहेर न आल्यामुळे घर मालकाने सायंकाळी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता, त्यांना कृष्णप्रिया ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती रामानंद नगर पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख, हर्षल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनस्थळाचा पंचनामा करुन विद्यार्थीनीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुसाईड नोट
मृत्यूपूर्वी तिने भिंतीवर “रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ” असे लिहिले, तसेच आई पप्पा मी तुमची ईच्छा पूर्ण करु शकणार नाही, मी जीवनाला कंटाळली असून माझ्या विचारांच्या प्रेशरमध्ये असून मला माफ करा अशी दोन पानी सुसाईड नोट तिने लिहली असल्याचं समोर आलं आहे. सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने सुसाईड नोट लिहून नैराश्यात एवढ्या टोकाचं पाऊल उचलल्याने समाजमन सुन्न झालं आहे.