जळगाव: शहरातील भाजप नगरसेवकांनी शोधले गाळ मिश्रित पाण्याचे कारण, कर्मचार्यांवर कारवाईची मागणीहराला गाळमिश्रीत पाणीपुरवठा होत असल्याने जनभावनांचा उद्रेक होत आहे. आमदार संजय सावकारे यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री नगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रात जाऊन याबाबतच्या कारणांचा शोध घेतला असता पाणीपुरवठा केंद्रातील भोंगळ कारभार यातून समोर आला आहे.
पाणी गाळप झाल्यानंतर त्यातील गाळमिश्रीत पाणी हे पाईप लाईनद्वारे थेट नदीत सोडले जाते व त्यासाठी चेंबरही बनवण्यात आले, मात्र एक चेंबर तुटलेल्या अवस्थेत होते. त्या चेंबरमध्ये रॅबिट पडताच पाईप-लाईन चोक अप झाली. परिणामी गाळ मागे येत परत पालिकेतील विहिरीत आल्याचे यावेळी पदाधिकार्यांना दिसून आला.
कर्मचार्यांच्या दिरंगाईमुळे नागरिक वेठीस
खरेतर रॅबिट काढणे, गटार साफ करणे या छोट्या बाबींकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने शहराला वेठीस धरले. साडेपाच कोटी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र अद्ययावत करण्याचा प्रयत्न सुरू असताना, अशी निष्क्रियता अपेक्षित नाही. आता पुनश्च या कामासाठी तीन कोटी रुपये निधी मागणी आमदार संजय सावकारे यांनी केली आहे. यापूर्वीचा निधी ही आमदार सावकारे यांनीच उपलब्ध करून दिलेला आहे.
पाणीपुरवठा करताना दर तासाने पाण्याचा नमुना घ्यावा लागतो त्याची नोंद करावी लागते तेही सपशेल बंद आहे. अशा भोंगळ कारभारने शहराला शुध्द पाणी मिळेलच कसे? आता त्यात सुधारणा झाली नाहीतर त्यास जबाबदार असणार्या कर्मचारी व अधिकार्यांना रस्त्यात पकडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवराज लोणारी यांनी दिला.
पालिकेच्या चुकीमुळे नागरिकांमध्ये संताप
गाळ वाहून नेणारी गटार गेल्या कित्येक वर्षापासून स्वच्छ करण्यात न आल्याने पाणी बाजूच्या एका घरात घुसले आहे. त्यामुळे कर्मचार्यांनी तो पाणी उपसा बंद केला आणि तो गाळ थेट शुध्द पाण्यात मिसळला गेला व अशुद्ध, गाळ मिश्रीत पाण्याचा पुरवठा झाला. हे अशुद्ध पाणी थेट नागरिकांना मिळाल्याने संतापाची लाट तयार झाली. या तांत्रिक अडचणींची माहिती पालिकेच्या मुख्याधिकार्यांना भाजप नगरसेवकांनी दिली.
माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, पिंटू ठाकूर, सतीश सपकाळे, निक्की बतरा, अजय नागराणी, मुकेश पाटील, बापू महाजन, प्रा.धीरज पाटील, गौरव लोणारी, रुपेश देशमुख, युवा मोर्चाचे भाग्येश चौधरी, अमोल पाटील, कैलास पाटील, आकाश राजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते