जळगाव मनपाच्या विविध सेवांबाबत भाजपच्या माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे लक्षवेधी

जळगाव :  महापालिकेतर्फे शहरात विविध सेवांबाबत तक्रारी येत आहेत. त्याबाबत भाजपच्या जिल्हाध्यक्ष्ाांसह माजी उपमहापौरांनी आयुक्तांची भेट घेत लक्ष्ा वेधले.यावेळी त्यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन देत चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे. मात्र शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरीयासारख्या गंभीर आजारांची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहे. शहराच्या विकासाच्या प्रयत्नांवर महानगरपालिकेकडून संथ गतीने कार्यवाही होत आहे. शहरातील मुख्य रस्ते व अनेक वसाहतींमधील पथदिवे रात्री बंद असल्याने दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या कंपनीची कामे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. त्यामुळे म.न.पा.च्या इतर कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. यासाठी विद्युत अभियंत्यांना मक्तेदार कंपनीकडूनच देखभाल व दुरूस्ती करण्याचे तातडीचे आदेश होणे आवश्यक आहे.

शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेची सुरूवात करण्यात आलेली आहे. मात्र अमृत योजनेद्वारा करण्यात येत असलेला पाणीपुरवठा हा अशुध्द असल्याचे दिसते. नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने अमृत जोडणी करणाऱ्या कंपनीने व्यवस्थित जोडणी केली नसल्याचे वास्तव आहे. ठिकठिकाणी गळती असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत आहे. महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क व अधिकार असलेला तसेच शासनाने तातडीने मंजूर केलेला सातवा वेतन आयोग लागू करावा. महिला कर्मचाऱ्यांना सायंकाळी सहा वाजेच्या आत सोडावे. अमृत योजनेतंर्गत सदोष जोडणीसंदर्भात तपासणी करून तसेच लिकेज बंदीस्त करून स्वच्छ पाणीपुरवठ्याची उपाययोजना करण्यात यावी. तसेच नवीन रस्ते तयार करण्यापूर्वी अमृत योजनेचे नळ संयोजन नागरिकांना देण्यात यावे. निवेदनावर  भाजपच्या जिल्हाध्यक्ष्ा तथा माजी नगरसेविका उज्वला बेंडाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. अश्विन सोनवणे, राजेंद्र घुगे-पाटील, मुविकोराज कोल्हे, रुपेश ठाकूर, भूषण भोळे, राहुल पाटील,आनंद गिरी, राहुल मिस्तरी यांच्या स्वाक्ष्ाऱ्या

आहेत.