jalgaon news: महिला गँग सदस्यांचा शोध एलसीबीकडे , पोलीस अधीक्षक एम. राजकुमार

जळगाव : वडनगरी फाटा बडे जटेधारी मंदिर परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराणमहा कथेच्या कार्याक्रमात पोलिसांनी राजस्थान व मध्यप्रदेशातील सराईत महिला गँगला जेरबंद केले. या गँगमधील आणखी अन्य सदस्य परिसरात असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने त्यांचा शोध घेवून ताब्यात घेण्याकामी ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बुधवार, 6 रोजी दिली.पोलिसांनी कथा परिसरात ताब्यात घेतलेल्या 27 पैकी 13 जण निमज जिल्ह्यातील एकाच गावातील असून त्यांच्यावर मध्यप्रदेश, राजस्थान राज्यात चोरी, पाकीटमार, जबरी चोरी असे विविध गुन्हे दाखल आहेत.अटकेत एका अल्पवयीनचा समावेश आहे.

टोळीतील संशयित नातेसंबधित असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. ही टोळी जेरबंद केल्यामुळे शेकडो महिला, पुरुषांचे मौल्यवान वस्तू चोरीपासून वाचविण्यात पोलिसांना यश आले,असे ते म्हणाले.भाविक म्हणूनच टोळीचा वावर ही महिला गँग महाशिवपुराण कथेत भाविक म्हणून सहभाग घेतात. महिलांच्या दागिन्यावर तसेच मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवतात. भाविकांचे व्यासपीठाकडे नजर आणि लक्ष असताना ते हात सफाई करतात,अशी माहिती दिली. धुळे तसेच नाशिक येथे शिवमहापुराण कथेत शिरकाव करून या गँगने चोऱ्या केल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित राहत आहेत. यागर्दीचा फायदा चोरटे घेण्याचा प्रयत्नात राहतात. अप्रिय घटना रोखण्यासाठी भाविकांनी मौल्यवान वस्तू तसेच महिलांनी दागिने, जास्तीची रोकड कथेच्या ठिकाणी आणू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पुन्हा केले.