Jalgaon News : महिला व बाल कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहासाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव करण्याचे आवाहन

जळगाव : केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील सामर्थ या योजनेअंतर्गत सखी निवास (नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह) ही घटक योजना राबविण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेले आहे. त्यानुसार राज्यात सुरु असलेली नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही योजना केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ या योजनेअंतर्गत सखी निवास या नावाने राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हयात एक सखी निवास भाडेतत्वावरील सुयोग्य इमारतीमध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार त्यांना प्रशासकीय खर्च, इमारत भाडे, पाळणा व्यवस्थापन या करीता अनुदानासह कार्यान्विती करावयाची असल्याने या पत्राव्दारे सुचित करण्यात आले होते, तसेच 3 जून, 2023 रोजी आयुक्तालय स्तरावरुन सर्व जिल्हयातील वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आलेली असून निकशाप्रमाणे इच्छुकसंस्थेने 30 जून, 2023 रोजी दुपारी 2.00 पर्यंत प्रस्ताव मागविणेबाबत आवाहन केलेले होते. परंतु आता सदरची मुदत वाढवुन दिनांक 4 मार्च, 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक संस्थांनी उपरोक्त निकशाप्रमाणे त्यांचे परीपुर्ण प्रस्ताव 4 मार्च, 2024 चे 5.00 वाजेपर्यंत या कार्यालयात 5 प्रतीत सादर रावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रितसर सविस्तर माहिती करीता आयुक्तालयाच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.