jalgaon news: माझ्याशी निकाह कर नाही तर …

जळगाव :  महाविद्यालयात थेट जावून फोटोच्या धाकावर तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याच्या घटनेपाठोपाठ जामनेर तालुक्यातील पहूर येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला थेट निकाहची मागणी घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे तर वारंवार बाजारात भेट असा अल्पवयीन मुलीस दम भरून नाही तर तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड टाकेल, अशीही धमकी संशयित पहूरपेठ येथील हुसेन शहा नाशिर शहा याने दिल्याने मुलीचे कुटुंब तणावात आले आहे. हिंदू मुलींना दमबाजी करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पहूर परिसरातील हिंदू बांधवांकडून या घटनेने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या घटनेने आरोपींविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

14 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही संशयित हुसेन शहा पहूरपेठ हा तरुण तिचा वेळोवेळी पाठलाग करीत होता.अल्पवयीन मुलगी टाळत असल्याने संशयिताने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता तसेच  10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता अल्पवयीन मुलीला संशयिताने रस्त्यावर गाठत पुन्हा तिची छेड काढत दमबाजी केली. इतकेच नाही तर तू माझ्याशी निकाह करशील का, असे म्हणत तिला दमबाजी करून मारण्याची धमकी दिली.

ॲसिड हल्ल्याची धमकी….

तू मला बाजारात भेटत जा अस संशयिताने या अल्पवयीन मुलीस गाठून बजावलं. तू जर नाही भेटली तर मी तुझ्या तोंडावर ॲसीड टाकेल, अशीही धमकी दिली. इतकंच नव्हे तर तू जर माझी नाही झाली तर मी तुला दुसऱ्याची होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकाराने गर्भगळीत झालेल्या पीडित मुलीला जबर मानसिक धक्का बसला आहे. अखेर तिने मोठ्या हिमतीने तरुणाकडून होत असलेल्या या असभ्य वर्तनाची आपबिती कुटुंबात सांगितली.

कडक कारवाईची मागणी..

परिवारातील सदस्यांनी या मुलीस धीर देत पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीवर बेतलेला प्रकार कथन केला. याप्रकरणी संशयित हुसेन शहा नाशिर शहा याच्याविरुध्द पोक्सोसह विनयभंग, धमकाविणे अशा कलमाखाली गुन्हा पहूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तपास पोउनि अमोल गर्जे करत आहेत. हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. मुस्लीम युवकांची टोळी यामागे असल्याचेच आता लक्षात येत असून याविरूद्ध पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित तरुणावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी हिंदू संघटनांना आक्रमक झाल्या आहेत.