जळगाव: प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील मालमत्ता थकबाकीदारांविरुध्द मनपा प्रशासनाने जोरदार कारवाई करीत सोमवार 8 रोजी 12 दुकाने सीलबंद करण्याची कार्यवाही केली. तर 24 दुकानदारांनी जप्तीची अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी भीतीपोटी ऑनलाईन थकबाकी करापोटीचा एकूण 9 लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईची नामुष्की टळली. प्रभाग समिती 3 अंतर्गत मार्केट भागातील एकुण 64 दुकानदारांनी थकबाकी करापोटी 28 लाख रुपये थकबाकी होती.
मनपा प्रशासनाने यासाठी अधिपत्र बजावले. मात्र 64 दुकानदारांनी थकबाकी कराचा भरणेबाबत प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे 8 रोजी मनपा प्रशासनाने दुकाने सीलबंद कारवाई करण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती एस.एस.पाटील व प्रकाश सोनवणे या प्रभागाधिकारी वर्गाचे अधिपत्याखाली प्रत्येकी 10 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना केले. पथकाने दिवसभरात 12 दुकाने सील केले. उर्वरित दुकानदारांवर मनपा प्रशासनातर्फे कार्यवाही केली जाईल. नागरिक, मालमत्ता थकबाकी धारकांनी अभय शास्ती माफी योजनेचा मनपा प्रशासनाने लाभ दिला. मात्र थकबाकीदारांनी भरणा केला नाही. ज्या मालमत्ताधारकांनी थकबाकी कर भरणा केला नाही. त्यांनी त्वरीत भरणा त्वरीत करुन मालमत्ता जप्तीची कारवांई टाळावी तसेच मनपा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. विद्या गायकवाड उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड, सह आयुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.