---Advertisement---

jalgaon news: मुलीस पळवून परस्पर लग्न केल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी

by team
---Advertisement---

जळगाव : मुलीस पळवून परस्पर लग्न केल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी  होऊन चार जण जखमी झाल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज नगरातील गजानन नगर, कानळदा रोड येथे शुक्रवार, 13 रोजी 10.30 वाजता घडली. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्यावरुन गुन्हे दाखल करण्यात आले. विजय नारायण इंगळे (34) रा. नाथवाड्याच्या बाजूला यांच्या तक्रारीनुसार  मुलीस पळवून नेले, किंवा तिचे लग्न याबद्दल काही माहित नसताना  अशोक ठोसर,  ठोसर यांची लहान मुलगी तसेच त्यांचा लहान मुलगा  यांच्यासह  10 ते 15 जण  सत्यम नगर केसी पार्कजवळ आले.

अचानक त्यांनी विजय इंगळे  यांच्या कपाळावर कशाने तरी मारले. तसेच विजय यांच्या लहान भावाला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी  अशोक ठोसर यांच्या कुटुंबातील तिघांसह 10 ते 15 अनोळखी व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास  एएसआय पुरुषोत्तम वाघळे करत आहे. तर अशोक किसन ठोसर (57) गजानननगर (कानळदा रोड)  यांच्या तक्रारीनुसार   शुक्रवार 13 रोजी रात्री 10.30 वाजता गजानन नगर येथे त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये होते. अजय इंगळे, विजय इंगळे तसेच इंगळे कुटुंबातील दोन महिला  यांच्यासह सोबतचे 10 ते 12 अनोळखी इसमांनी येवून अशोक ठोसर यांच्या डोक्यात रॅक पाडून तर ठोसर यांच्या मुलाच्या डोक्यात  कुंडी मारली. ठोसर यांच्या मुलीला लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास एएसआय पुरूषोत्तम वाघळे करत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment