Jalgaon News: मूल होण्यासाठी औषध देऊन बोगस डॉक्टरने केली इतक्य रुपयांची फसवणूक

जळगाव : कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचे सांगून मूल होण्यासाठी औषध देऊन तालुक्यातील दोघांची सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील एका टोळीचा रावेर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे,

मिळालेल्या माहितीनुसार ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नाही अश्या जोडप्यांना हेरून त्यांना मूलबाळ होण्याची खात्री देत औषधांच्या नावाने फसवणूक करणारी टोळी जळगाव जिल्ह्यात कार्यरत होती.हिंगणे बुद्रुक येथील योगेश कैलासगिरी गोसावी हा आपण डॉक्टर असल्याचे सांगत सामाज्यात फिरत होता. एखाद्या गावात मूलबाळ नसलेल्या जोडप्याचा शोध अन्य सहकारी घेत असत. आमच्या ओळखीचे एक डॉक्टर असून, त्यांच्या औषधामुळे अनेकांना गुण आला आहे. तुम्हीही प्रयत्न करा  असे सांगून डॉक्टरशी संपर्क साधून दिला जाई. या जोडप्याला एका विशिष्ट औषध दुकानातून औषध घेण्यास सांगितले जाई.महिलेची प्रेग्नन्सी टेस्ट करण्याचे नाटक केले जाई, ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचेही सांगितले जाई. अश्या प्रकारे या लोकांना फसवले जात होते.

त्याच्यासोबत गजानन दगडू माळी व त्याचा भाऊ किशोर दगडू माळी, नरेंद्र वीरेंद्र नामदेव,या चौकडीने वेळोवेळी अनेक जोडप्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. रावेर पोलिसांना सर्वप्रथम पातोंडी येथील विजय कौतिक पाटील यांना या टोळीने फसविल्याची माहिती मिळाली. विजय पाटील यांच्याकडून या चौघांनी वेळोवेळी सहा लाख ६९ हजार रुपये उकळले आहेत. विजय पाटील यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन माहिती घेतली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर तपास मोहीम सुरू झाली. मात्र, याचा सुगावा लागताच मुख्य सूत्रधारासह तिघे फरारी झाले. पण, गजानन माळी याला पोलिसांनी अटक केली.