---Advertisement---

Jalgaon News: मोबाईल चोरीतील सराईत मोगँबो पोलिसांच्या जाळ्यात

by team
---Advertisement---

जळगाव : एस.टी.बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महागडा मोबाईल चोरुन नेला. १७ रोजी ९.३० वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकावर ही घटना घडली. जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीवरुन संशयित फैजल उर्फ मोगँबो ईब्राहीम तांबोळी  याला ताब्यात घेतले.

विशाल विजय चक्का रा. एव्हेन्यू आकाश अमृतसर पंजाब हे धुळे येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर आले. बसमध्ये ते चढत होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून मोबाईल काढत पोबारा केला. प्रकार लक्षात आल्याने चड्डा यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच माहिती घेतली.

बसस्टॅन्ड परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेत तपासाचे चक्रे गतीमान केले त्यानंतर पथकाने संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाईल हस्तगत केला आहे. मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात सराईत गुन्हेगार म्हणून त्याची पोलीस डायरीत नोंद आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment