जळगाव : देशाचे कणखर नेतृत्व तेजस्वी गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे जळगावात थोड्याच वेळात आगमन होणार आहे. त्यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सागर पार्क येथे आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री आ. गिरीश महाजन, खा.हिना गावीत, खा.रक्षा खडसे, डॉ.विजय कुमार गावीत, स्मीता वाघ, डॉ.सुभाष भामरे, खा. उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे आदी व्यासपीठावर उपस्थित आहेत. दरम्यान, युवकांनी सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे.
Jalgaon News : युवा संवाद सभेला थोड्याच वेळात होणार सुरुवात, युवकांची अलोट गर्दी
Updated On: मार्च 5, 2024 4:10 pm

---Advertisement---