Jalgaon News : राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील बडतर्फ

जळगाव  : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरीनंतर त्यांना समर्थन देणार्‍यांवर पक्षातर्फे  कडक कार्यवाही करण्यात आली. यात जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील व जळगाव शहर युवक कार्याध्यक्ष सुशिलकुमार शिंदे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ८ आमदारांसह बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यापार्श्‍वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकार्‍यांनी अजित पवार व बंडखोर आमदारांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या समर्थकासह जल्लोष केला होता. अशा प्रकारे पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे.

राज्यातील या अजित पवार सर्मथक पदाधिकार्‍यांना युवक प्रदेशअध्यक्ष मेहबूब खान यांनी बडतर्फे केले आहे. यात जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र नाना पाटील व जळगाव शहर युवक कार्याध्यक्ष सुशिलकुमार शिंदे यांचा समावेश आहे. यापुढे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव, चिन्ह आदींचा वापर करून नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे नमूद केले आहे.