---Advertisement---
---Advertisement---
जळगाव ः जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्यातर्फे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार, 9 डिसेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले होते. यात एका मोटार अपघात नुकसानभरपाई प्रकरणी 80 लाख रुपयाची तडजोड पॅनल क्रमांक दोनवरील मुख्य न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे यांच्या समक्ष यशस्वीरित्य दोन्ही पक्षांमध्ये करण्यात आली.
चाळीसगाव येथील रहिवाशी जयश्री हेमंत चौधरी यांचे पती हेमंत विष्णू चौधरी यांचा 25 जानेवारी 2021 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. यात हेमंत चौधरी यांचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातात गाडीचालक साबीरखान मोहम्मदखानच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवली. यानुसार चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
मयत हे घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चाळीसगाव येथे कायमस्वरूपी यंत्र चालक या पदावर कार्यरत होते. मयत हे घरातील एकमेव कमावते व्यक्ती असल्यामुळे मयत यांचे वारस जयश्री हेमंत चौधरी (पत्नी) त्यांचे दोन अज्ञान मुली ज्यांचे वय केवळ आठ व दहा वर्षे आहे. मयताचे वडील विष्णू देवचंद चौधरी व आई यांनी जळगाव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरणात ॲड. महेंद्र सोमा चौधरी यांनी मोटार अपघात नुकसानभरपाई मिळणे कामी 2021 साली दावा दाखल केला. हे प्रकरण हे राष्ट्रीय लोकन्यायालयात अर्जदारांचे वकील ॲड. महेंद्र सोमा चौधरी व विमा कंपनीतर्फे ॲड. प्रसाद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली लोक न्यायालयात ठेवण्यात आले. त्याअनुषंगाने राष्ट्रीय लोक अदालतेच्या दिवशी चर्चेअंती याप्रकरणात विमा कंपनीने नुकसान भरपाईपोटी 80 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे संमती अर्जदारांना दर्शवली. विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे सचिव एस. पी. सय्यद यांचे सहकार्य लाभले.