jalgaon news: वर्दीचा हिसका दाखविताच चोरीचा मुद्देमाल दिला काढून

जळगाव : शिवकॉलनीत कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे  1 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. रविवार, 15 ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला. तक्रार दाखल केल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला चोरी केली नसल्याचा त्यांनी आव आणला. वर्दीचा हिसका दाखविताच त्यांनी कबुली देत  सुमारे 1 लाख 6 हजार  400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना काढुन दिला. सागर राजाराम गवई (29) पिंप्राळा हुडको, अब्रार अमित खाटीक (18) उस्मानीया पार्क, समीर शेख इकबाल (22), अमोल प्रकाश शिरसाठ (25) दोघे रा. दूध फेडरेशन हुडको अशी संशयितांची नावे आहेत. मेहरुण येथील प्रदीप सुदाम वाणी यांच्या मालकीचे शिवकॉलनीत निवासस्थानी त्यांनी साऊंड सिस्टीमचे साहित्य ठेवले होते. कुलूप तोडून चोरट्यांनी येथील साहित्य लांबविले. याप्रकरणी तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. पोनि शिल्पा पाटील यांनी गुन्ह्याचा तपास सपोनि  विठ्ठल पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानुसार पोहेकॉ  संजय सपकाळे, पोहेकॉ सुशील चौधरी, पोना रेवानंद साळुंखे,पोना हेमंत कळसकर, पोना विनोद सूर्यवंशी, पोना अतुल चौधरी, पोकॉ उमेश पवार, पोकॉ रवींद्र चौधरी, पोशि जुलालसिंग परदेशी, पोशि इरफान मलिक यांनी तपासचक्रे फिरवून संशयितांना ताब्यात घेतले. सुमारे 1,06,400 रुपयांचा साऊंड सिस्टीमचे चोरुन नेलेले साहित्यही त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले.