पाचोरा : विवाहितेने माहेरहून पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी पाचोऱ्यातील महिलेचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने अखेर त्रस्त महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात पतीसह सासऱ्याच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील रहिवासी तरुणीचा विवाह नाशिक जिल्ह्यातील जायखेडा येथे झाला. 25 नोव्हेंबर 2020 पासून ते आजपावेतो जायखेडा, ता. सटाणा, जि.नाशिक येथील सासरचे मंडळी पती अमोल मनोहर बोरसे, सासरे मनोहर दगा बोरसे, सासू सुरेखा मनोहर बोरसे, चुलत सासू अलका सुनील बोरसे, मामसासरे संजय काशिनाथ सोनवणे यांनी वेळोवेळी विवाहितेने माहेरुन 5 लाख रुपये आणावे यासाठी शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच छळ केला, अशी फिर्याद विवाहितेने दिली. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन निकम करीत आहे.