चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरातून अवैरीत्या गुटखा व पानमसाला यांची वाहतूक करणारी कार जप्त करीत त्यातून गुटख्याचा दिड लाखांचा साठा जप्त केला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव शहरातून अवैधरीत्या गुटखा वाहतूक व होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने कारवाई करत कार क्रमांक (एम.एच.43 एक्स . 5256) ही अडविली असता झडतीतदरम्यानत कारमध्ये एक लाख 44 हजार रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला मिळून आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कारचालक याला अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले करीत आहे.