Jalgaon news: शेतातून तब्ब्ल ४५ हजारांचे विद्युत तारांची चोरी

यावल : तालुक्यातील आसराबारी शेतशिवारातील शेतातून अज्ञात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लघू दाबाचे तार लांबवले. एक हज मीटर लांबीचे ४५ हजार रुपये किंमतीचे तार चोरी झाले असून य यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आसराबारी, शेत शिवारात जगन्नाथ सखाराम पाटील यांच्या शेतापासून ते गोविंदा पाटील यांच्या शेतापर्यंत राज्य विद्युत कंपनीचे खांब टाकले आहे व या लघु दाबाचे तार टाकण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर कोणीतरी चोरट्यांनी पाच खांबावरील लघुदाबाचे एक हजार २२० मीटर लां चोरी केले ज्यांची किंमत ४५ हजार रुपये होती. हा प्रकार सकाळी नि आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात यावल ग्रामीण कक्षाचे दीपक भंगाळे यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली.